या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मग अमर म्हणाला, लगोलग करण्याच्या गोष्टीत त्यानं कामाचा व्याप कमी केला, कामाचे प्राधान्यक्रम ठरवले. शरीराची काळजी घ्यायला सुरुवात केली आणि मन आनंदी ठेवण्याचा कटाक्ष पाळला. तिसऱ्या आणि दूरवरच्या पल्ल्याच्या दृष्टीनं अमरनं आपली स्वत:ची मूल्यव्यवस्था तपासली, घेतलेल्या जबाबदान्यांचं पुन्हा अवलोकन केलं, जीवनशैलीत आमूलाग्र बदल केला आणि व्यक्तिगत पातळीवर स्वत:च्या क्षमता विकसित केल्या.

 मी ऐकलं आणि थक्क झालो. वाटलं अमर शिवदासानी खरं म्हणजे मेला होता. कामानं खाक झाला होता. मात्र साध्या पण महत्त्वाच्या बारा गोष्टी करून त्यानं त्याचा पुनर्जन्म करून घेतला.

कार्यशैली। ८२