पान:कार्यसंस्कृती.pdf/१०१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्प्रिंटचं तंत्र एखादं किचकट काम संपवायचं असेल त्या वेळेस असं काम उरकायची एक युक्ती आहे. त्या युक्तीला स्प्रिंट किंवा 'भरधाव कामाचं तंत्र' असं म्हणतात. शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत धावपटू जीवाची बाजी लावून भरधाव पळतात, त्याचंच तत्त्व म्हणजे असं, तुम्हाला एक किचकट अहवाल पूर्ण करायचा आहे. तो लिहायला दोन-चार दिवस तरी लागतील, कामात गुंतागुंत फार आहे. अशा वेळेस काम करण्याच्या आदल्या दिवशी लिखाणाची पूर्वतयारी करायची. मस्त कॅसेट ऐकायच्या, रिलॅक्स व्हायचं. पूर्ण झोप घ्यायची आणि मग कामाला लागायचं काम सुरू केल्यावर पूर्ण होईपर्यंत थांबायचं नाही. मध्ये फोनही घ्यायचे नाहीत. कोणाला फोन करायचेही नाहीत. भेटी, गप्पा अजिबातच नाहीत. तुम्ही आणि ते काम, कामादरम्यान फक्त जेवण, चहा, झोप यांसारख्या आवश्यक गोष्टी करायच्या. मूड एकदा का लागला तर सरळ दहा-बारा तासांत काम पूर्ण होतं. ज्या कामाला कित्येक दिवस लागले असते ते चटकन संपतं. ही युक्ती फक्त ऑफिसच्या कामाला योग्य आहे असं नाही. घरकामातही हेच तंत्र वापरून कामं पूर्ण होतात. कार्यसंस्कृती १००