पान:कार्यसंस्कृती.pdf/१०४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घटका भरली संपूर्ण मानवजातीची वेळ भरली आहे का असंच मला ती बातमी ऐकून वाटलं. दक्षिण ध्रुवाजवळ काही ठिकाणी ओझोनचा थर विरळ होतो आहे आणि काही ठिकाणी तर चक्क रिकामंच झालं आहे. असं झालं तर सूर्यकिरणांमधला काही भाग पृथ्वीवरची सजीव सृष्टीच एक एक करून नष्ट करू शकेल असं काही शास्त्रज्ञांचं मत आहे. त्याचे काही दुष्परिणाम दक्षिण अमेरिकेच्या टोकावरच्या मनुष्यवस्तीमध्ये दिसत आहेत. आशिया खंडावर एक मोठा, अतिशय मोठा प्रदूषणानं निर्माण झालेला ढग जमा झाला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून भारतात पावसाचं मान पार बिघडलं आहे. धुरावाटे, प्रदूषणावाटे आकाशात फेकत असणाऱ्या कचऱ्यामुळे आपणा सर्वांचीच वेळ भरत आली आहे असं वाटू लागलं आहे. माझा वेळ वाचावा म्हणून पेट्रोल वाहन घेऊन मी वेगानं जातो खरा; पण त्यानं सान्या मनुष्य जमातीचा वेळ मात्र कमी होतो आहे. पण काळ असा आहे की माझ्या गांडीतून धूर सोडून भरधाव जाताना चालणाऱ्या माणसाचाही विचार करत नाही, तर अखिल मानव समाजाचा विचार करण्याइतपत वेळ आहे कुणाला? आजच्या आपल्या जगण्यानं, जगण्याच्या पद्धतीनं ती वेळ कधी भरणार ते ठरणार आहे. १०३ । कार्यसंस्कृती