पान:कार्यसंस्कृती.pdf/१०५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अनुभवाची शिदोरी अमेरिकेतील अनेक महत्त्वाच्या उद्योगांमध्ये समाजसेवा हा एक उद्योग म्हणून बघितला जातो. याला उद्योग का बरं म्हणायचं असा मला प्रश्न पडला. तेव्हा चक्क इंटरनेटच्या मदतीनं काही उत्तरं सापडली. उद्योगात असणारी माणसं हा या सेवेचा केंद्रबिंदू मानला तरीही माणसं मुळात स्वतः सोडून इतरांचा विचार करतात का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अमेरिकेत अगदी क्लिंटनदेखील पदावर असताना एका लहानशा संस्थेत पडेल ते काम करण्यासाठी जात असे हे सर्वज्ञात आहे. धर्म म्हणून, नियम म्हणून किंवा संस्कृती म्हणून काही गोष्टी जतन करण्याची पाश्चात्त्य संस्कृती आहे. आपण त्याला एक फॅड म्हणून जबाबदारी टाळलेली आहे. प्रत्येक नागरिकाला काही ना काही समाजसेवा करणं यात फार अभिमानास्पद वाटतं अशी त्यांची परिस्थिती आहे. असं अनेक ज्येष्ठांकडे असलेलं अनुभवाचं भांडार आपण जतन करून आणि जोपासून वापरू शकू. समाजसेवेच्या क्षेत्रात अनेक मोठेमोठे प्रयोग हे पाश्चात्त्यांकडून शिकण्याजोगे आहेत. प्रत्येक जण आपापल्या कामात एक सेवा म्हणून काही वेळ लहानशा कामासाठी देऊ लागला तर त्याचं मूळचं काम तो अधिक चांगल्या प्रकारे करू शकेल यात शंका नाही. त्या अनुभवाचा उपयोग करून आपल्या कामालाही वेगळं वळण देऊ. पण अशी कामं स्वीकारायला हवीत. कार्यसंस्कृती १०४