पान:कार्यसंस्कृती.pdf/११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खोटेपणाच्या भिंती त्या माणसाचं बोलणं मी ऐकलं आणि तो विनोद करतो आहे काय असं वाटलं म्हणून मी क्षीणसा हसलो. "तुम्ही तुमचं नाव सांगता आहात आणि सहीपण करता आहात; पण तुम्ही तेच कशावरून? म्हणून घरी जाऊन तुमचा फोटो असलेलं काही तरी घेऊन या,' असं त्याचं म्हणणं होतं. ऑफिसकडे मी पाहिलं. ते आणि तो समोरचा माणूस बधेल असं काही मला वाटलं नाही. मी मुकाट घरी जाऊन माझं लायसन्स घेऊन आलो. त्यानं दोन दोनदा माझ्याकडे पाहिलं. त्याची खात्री पटलीशी दिसली आणि मग मी निघालो. बऱ्याचदा आपण सुरुवात करतो तीच अविश्वासावर समोरचा माणूस जे बोलतो आहे ते खरं आहे अशी सुरुवात न करता तो खोटा आहे अशीच सुरुवात करून आपण अविश्वासाच्या किती तरी खोट्या भिंती आपल्याभोवती उभ्या करून ठेवतो. 'तू बहुतेक खोटा आहेस, पण मला एकदा खात्री करून दे की तू खोटाच आहेस', अशी सुरुवात केली तर कसं बांधलं जाईल आपलं नातं? कार्यसंस्कृतीचं मूळ 'विश्वास' असावा, 'अविश्वास' नको. उत्तर असावं, प्रश्न नको. समाधान असावं, शंका नको. 'मैत्री' असावं, शत्रुत्व नको. कार्यसंस्कृती १०