पान:कार्यसंस्कृती.pdf/१११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काहीही कितीही अवघड गोष्ट असेल, कितीही असाध्य लक्ष्य असेल तरी त्या विशिष्ट ध्येयावरील निस्सीम भक्तीनं आणि प्रयत्नांच्या पराकाष्ठेनं ती गोष्ट मिळवता येतेच, असं ब्राझिलमधील प्रख्यात लेखक पाऊलो कोएल्यो यांनी त्यांच्या 'द अलकेमिस्ट' या सुप्रसिद्ध कादंबरीत म्हटलं आहे. कितीही असाध्य, कितीही कठीण असं ध्येय असलं, तरीही, चराचरातील सर्व चांगल्या शक्ती, सर्वस्व एकवटून तुमच्या सत्प्रवृत्त ध्येयासाठी उभ्या ठाकतात आणि तुम्ही तुमच्या ठिकाणापर्यंत पोचू शकताच शकता. मात्र, त्यासाठी दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आणि आवश्यक आहेत. एक म्हणजे तुमच्या ध्येयावरील निस्सीम श्रद्धा आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तयारी आपल्या कामावर · आपलं अगाध प्रेम हवं आणि त्यासाठी कुठलीही किंमत देण्याची, प्रयत्नात कसूर न सोडण्याची तयारी हवी. एवढं असेल तर काहीही करता येईल. अगदी काहीही. कार्यसंस्कृती ११०