पान:कार्यसंस्कृती.pdf/११२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यज्ञ ज्ञानाचा 'फॉर्म्युन' या जगप्रसिद्ध मासिकात सातत्यानं लेखन करणाऱ्या ब्रेन्ट श्लेन्डर या लेखकानं बिल गेटस् कसे काम करतो याचा अभ्यास काही आठवडे केला. काम करताना मायक्रोसॉफ्टमध्ये छान फोटो काढले आणि 'फॉर्म्युन'मध्ये त्याच्या कामाच्या पद्धतीवर एक सुंदर लेखही लिहिला. त्या लेखात मायक्रोसॉफ्टच्या मुख्य तांत्रिक अधिकाऱ्याचं, फ्रेम मंडी याचं सुंदर वाक्य आहे. तो म्हणतो, 'सध्या बिल मायक्रोसॉफ्टच्या फक्त तीन गोष्टी करतो. अत्यंत तरुण तंत्रज्ञांचं ऐकतो. त्यांच्या विचारांना आणि कल्पनांना अत्यंत कडवं आव्हान देतो आणि त्या तरुणांना कामाचे धडेही देतो. ऐकतो, आव्हान देतो आणि कोचिंग करतो.' किती अनुभवी आणि दिग्गज माणसं तरुणांचं ऐकतात. किती ठिकाणी चर्चांचे आणि वादविवादाचे फड जमतात? किती ठिकाणी सासू आपल्या सुनेला किंवा आई आपल्या मुलीला वा मुलाला अभिजात ज्ञानाचे धडे देते? कुठल्या संस्थांमध्ये नवी पिढी घडवण्यासाठी त्या संस्थेतला सर्वात मोठा माणूस आपला बहुमोल वेळ देतो? ऐकणं, आव्हानं देणं, आणि ज्ञानाचे धडे देणं म्हणजे ज्ञानयज्ञ. हा ज्ञानयज्ञ आपण उद्याचा आपला वेळ कसा घालवणार आहोत हे ठरवणार आहे. असा यज्ञ समाजात आज कुठे चालू आहे? १११] कार्यसंस्कृती