पान:कार्यसंस्कृती.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुक्त आणि रमणीय 2 संस्कृतीचा संबंध मूल्यांशी आणि श्रद्धांशी फार जवळचा असतो. तुम्ही काय आणि कुठली मूल्यं मानता, पाळता आणि त्या मूल्यांचं दर्शन तुमच्या रोजच्या वागण्यामध्ये आणि कामामध्ये किती दिसतं यावरून तुमच्या कार्यसंस्कृतीचा स्वभाव कळतो. काम करण्याच्या प्रत्येक ठिकाणाला अशी संस्कृती हवी, काही विशिष्ट आग्रह हवेत, नियम हवेत आणि कार्यपद्धतीही हवी. माणूस जसा काम करता करता काही निर्मिती करतो, काही बनवतो किंवा काही सेवा देतो तसा त्या कामामुळे त्याच्यावर काही परिणामसुद्धा होतो. कामाचं ठिकाण हे खरं म्हणजे आनंदाचं ठिकाण व्हायला हवं. एखादं मूल चेंडूशी एखाद्या बागेत छान खेळतं, बागडतं, तसं कामाच्या ठिकाणी व्हायला हवं. मुक्त, स्वच्छंद, मैत्रीचे, आनंदाचे आणि मानवी संबंध प्रस्थापित करणं म्हणजे कामाचं ठिकाण एका सुंदर बागेसारख करणं. मुक्त आणि रमणीय. कामाचं ठिकाण सुंदर करण्याची आपली कल्पना म्हणजे उत्तम फर्निचर, भिंतीवर त्रोटक चित्र आणि खिडक्यांना उंची पडदे; पण ते म्हणजे आसपासचं वातावरण सुंदर बनवणं झालं. माणसाला रमणीय वाटतो तो भिंतीचा रंग नव्हे, तर सहकाऱ्यांची प्रेमळ हाक. विश्वासाची आणि खरी. ११ कार्यसंस्कृती