पान:कार्यसंस्कृती.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चॉइस 4. --- mar. --- L ARE स आपल्या सर्वांकडे एक 'चॉइस' करण्याची संधी असते. आपली गाड़ी उजवीकडच्या 'फास्ट लेन'मध्ये ठेवायची की डावीकडच्या 'स्लो लेन'मध्ये? 'फास्ट लेन'मध्ये मस्ती आणि धुंदी आहे. रोज नव्या नव्या प्रसंगांना सामोरं जाण्याची नशा आहे. उफाळता उत्साह आहे. शरीराची आबाळ आहे, मनाची तडफड आहे; पण प्रचंड भौतिक यशाची, मानमरातबाची शक्यता त्यात आहे. 'स्लो लेन' वेगळी आहे, त्यात रस्त्याशी गप्पा मारत जाणं आहे अन् आहे शांत जीवनशैली. कार्यसंस्कृती १२