पान:कार्यसंस्कृती.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या 'लेन'मध्ये आपलं वाहन हाकण्याचं कौशल्य आपल्याला अनुभवता येईल. 'फास्ट लेन' मध्ये नुसतंच गतीचं वेड असेल, तर 'स्लो लेन'मध्ये शरीराची अन् मनाची चांगली जोपासना असेल. आयुष्य दीर्घकाळ पण उन्नत पद्धतीनं घालवण्याचं सामर्थ्य त्यात असेल. 'फास्ट लेन'मध्ये अपघाताचा धोका तर आहेच; पण आपण लवकर थकून प्रवास थांबवण्याचीही भीती त्यात आहे. 'स्लो लेन'मध्ये लांब पल्ला गाठण्याची ताकद आहे. दोन्ही 'लेन्स' आपल्यासमोर आहेत. प्रश्न आहे तो आपण कशा प्रकारचं आयुष्य जगू इच्छितो याचा. १३ । कार्यसंस्कृती