पान:कार्यसंस्कृती.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माणसांची अचूक निवड वसंत हा एक मराठीमधला आघाडीचा दिग्दर्शक आहे. दूरदर्शनवरच्या मालिका बनवणं या कामात त्याचा हात कुणीही धरू शकत नाही. त्यानं दिग्दर्शित केलेल्या असंख्य मालिका प्रचंड गाजल्या आणि त्याचं प्रचंड नावही झालं. वसंत खूप लोकप्रिय आहे. एकच अडचण आहे. माणसं निवडण्यामध्ये वसंत कमालीचा म्हणजे कमालीचा चोखंदळ आहे. इतका कमालीचा की त्याचा तो स्वभाव थोडासा अतिरेकाकडे जातो. एखादा कॅमेरामन घ्यायचा असेल तर वसंत त्याची कसून चौकशी करतो. त्याचा अनुभव काय, विशेष नैपुण्य काय, त्यानं याअगोदर कुठली कामं केली आहेत हे अगदी व्यवस्थित तपासतो. त्याचा स्वभाव पाहतो. टेंपरामेंटची चाचपणी करतो, तो इतरांबरोबर कसं काम करतो हे पाहतो आणि मगच त्याला काम देतो. कधी कधी वसंत अती करतो, आणि चांगली माणसं मिळाली नाहीत म्हणून चक्क एखादा प्रोजेक्ट अडवून ठेवतो. असं केलं की मग मात्र आम्ही सारेच त्याला नावं ठेवतो. आम्ही त्या वेळी नावं ठेक्स असलो तरी एक गोष्ट मला पक्की माहीत आहे. माणसांच्या योग्य आणि अचूक निवडीमुळेच आज वसंत आहे तिथं आहे. कार्यसंस्कृती १४