पान:कार्यसंस्कृती.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माणसं स्टाफ नव्हे! 7 वेंडी नावाच्या एका दुकानाच्या मालिकेचं उद्घाटन करण्यासाठी टॉम पीटर्स या नामवंत व्यवस्थापनतज्ज्ञाला पाचारण करण्यात आलं होतं. डेव्ह थॉमस हा वेंडीचा मालक. आपल्या भाषणात डेव्ह त्या पाहुण्यांकडे म्हणजे टॉम पीटर्सकडे पाहून म्हणतो कसा “आता ऐका तुम्ही मी काय म्हणतो ते. तुमच्या भाषणात तुमच्या समोर बसलेल्या सर्वच्या सर्व म्हणजे १२०० माणसांची तुम्ही उत्तम काळजी घ्या. ती या देशातील सर्वोत्तम माणसं आहेत. ती म्हणजे स्टाफ नव्हेत. ती सारी अफलातून क्षमता असलेली माणसं आहेत. तुमच्याकडे जे उत्तम ज्ञान असेल ते त्या साऱ्यांमार्फत पोहोचवा." त्यानंतरचं टॉम पीटर्सचं भाषण उत्तम झालं हे सांगण्याची गरज नाही आणि वेंडी या दुकानाच्या भरभराटीत तिथल्या माणसांनी किती योगदान केलं हेही सांगण्याची आवश्यकता नाही. डेव्ह थॉमस हा माणूस त्याच्याकडे काम करणाऱ्या जवळजवळ प्रत्येकाचा उत्तम मित्र होता. प्रत्येकाशी त्याचं स्वतःचं असं एक नातं होतं, त्याचा संवाद होता. एकाला काढून दुसऱ्याला आणता येतं ते आपण माणसांना स्टाफ म्हणालो तर; पण काम करणाऱ्या माणसांना माणसं मानलं तर ती जी अफाट ताकद देतात त्याला मात्र काहीही मर्यादा नसते हेच खरं. १५ कार्यसंस्कृती