पान:कार्यसंस्कृती.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कचकड्याची कार्यसंस्कृती सध्याचं जग हे स्पर्धेचं जग आहे. एकमेकांवर कुरघोड़ी करून, काटून, भारून स्वतःचं घोडं पुढं दामटण्याचं हे जग आहे. आणि स्पर्धा एवढी तीव्र, गंभीर आणि तिखट आहे, की त्या स्पर्धेचीदेखील एक हिंस्र संस्कृती आज आपल्यासमोर उलगडताना दिसते आहे. कुठली तत्त्वं आहेत या स्पर्धेच्या जगाची? कुठली आणि कशी आहे ही संस्कृती? यात दिसतंय ते असं आहे- इथं गती महत्त्वाची आहे. गुणवत्ता नाही. इथं कुठलाही शॉर्टकट घेणं सर्वमान्य आहे पण मेहनतीला महत्त्व नाही. मेकअपवर, बाह्य स्मार्टनेसवर भिस्त आहे, आंतरिक सौंदर्याला आणि मानवी संबंधाला फाटा मारला आहे. यश मिळवण्यासाठी या स्पर्धेत कुठलाही खोटेपणा चालतो. गंडवागंडवी तर अगदी नेहमीची सामान्य बाब आहे. जो पैसेवाला तो यशस्वी आणि जो यशस्वी तोच खरा अशी सध्याची संस्कृती चारी बाजूला दिसते आहे. ही कचकड्याची संस्कृती सहज पटकन यश देईलही कदाचित, पण जास्त लांब टिकणारा दीर्घ प्रभाव त्यानं निर्माण होईलच असं नाही. तसं व्हायला आवश्यक आहे सचोटी, प्रामाणिकपणा, परिश्रमांवर श्रद्धा आणि माणसांवर प्रेम. कार्यसंस्कृती १६