पान:कार्यसंस्कृती.pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषा

आपण वापरत असलेली भाषा ही कार्यसंस्कृतीतील एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण काय शब्द वापरतो, आपला स्वर तेव्हा कसा असतो, आपण बोलतो ते शब्द लोकांना दूर सारतात की जवळ आणतात, या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आमच्या ऑफिसातला राघवन एक आठी कपाळावर ठेवून समोरचा माणूस बहुधा खोटं बोलत असणार असा चेहरा करून अत्यंत कोरड्या भाषेत बोलत असतो. त्याच्या या पद्धतीमुळे तो कायम एकटा पडतो आणि सर्व गटात पुरा एकजीव होत नाही. चित्रा आणखी वेगळी आहे. तिची कशाचीही सुरुवात नाहीनं होते. आज संध्याकाळपर्यंत ही फेसशीटस् भरून होतील का असं विचारल्यावर ती नाही जमणार, मध्येच लाइट गेले तर काय वगैरे मुद्दे काढते. तिचीही भाषा 'कायम' नाहीच्या वळणावरून परिस्थिती अवघड करण्यामध्ये असते. दर वर्षी किमान एक नवी गोष्ट आत्मसात करायचीच असा निश्चय आपण केला पाहिजे. असं केल्यास आपली आपल्यालाच स्वतःची जी ओळख होत जाईल; त्याचा उपयोग खूपच होत राहील. प्रत्यक्ष कामात आणि आत्मविश्वासात. कार्यसंस्कृती ॥ २२