पान:कार्यसंस्कृती.pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आपल्या कामाच्या जागा . माणूस हा काम करणारा प्राणी आहे. कामात आणि काम करत राहण्यातच त्याचं माणूसपण आहे. हे त्याचं माणूसपण टिकवायचं आणि वाढवायचं असेल तर आपण आपल्या काम करण्याच्या जागा सुंदर बनवायला हव्यात. सुंदर म्हणजे नुसता चांगला रंग आणि झकपक फर्निचर नाही, जिथं बसायला, बोलायला, काम करायला बरं वाटेल, आपलंसं वाटेल असा पैसा असावा, मोकळा, जवळचा, मैत्रीचा. मुक्त खेळता यावं, सैलसर होता यावं, अशी छान सुंदर रचना हवी. ज्यातून प्रेरणा मिळेल. मन प्रफुल्लित, उल्हसित होईल अशा वस्तू, पेंटिंग्ज, शिल्पं असावीत. उबदार, प्रेमळ, साधं, मनाचं भरणपोषण होईल अशी व्यवस्था असावी. माणसं हसतमुख, उत्साही, आनंदी, मोकळी आणि पारदर्शक वागणारी असावीत. सर्वत्र सहकार्याचं, सहजीवनाचं, मैत्रीचं नातं असावं. मानवी संबंधांना महत्त्वाचं स्थान देणारं. माणसाला त्याची प्रतिष्ठा टिकवणारं वाटतं, हे सारं स्वप्नवत तर नाही ना? वाटतं, हे सारं होण्यासाठी किती किती करायला पाहिजे, काय काय व्हायला पाहिजे. पण सांगू, आपण आपल्या कामाच्या जागा जर अशा बनवल्या तर मग माणुसकीची जोपासना करण्यासाठी आणखी काही करायला नको. कार्यसंस्कृती २६