पान:कार्यसंस्कृती.pdf/३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

? ! संपर्काची कला कुठलंही काम असो, कुठलीही जागा असो, एखादं गॅरेज असो किंवा फिल्मचं शूटिंग करणारं एखादं युनिट असे, माणसामाणसांतील नातं आणि एकमेकातील संपर्क या गोष्टी अतीव महत्त्वाच्या असतात. कित्येक माणसं मी अशी पाहतो, की जी मनानं अतिशय चांगली असतात. त्यांच्याकडे सांगण्यायोग्य खूप काही असतं; पण ते कसं सांगायचं किंवा प्रभावीपणे ते कसं पोचवायचं हे मात्र त्यांना जमत नाही. संपर्काची कला काही त्यांच्याकडे नसते. अशांसाठी तीन अगदी साधी सूत्रं आहेत. एक म्हणजे त्यांनी स्वतः स्वतःशी आपल्याला काय म्हणायचं आहे याबाबत स्पष्ट कार्यसंस्कृती ३०