पान:कार्यसंस्कृती.pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असायला हवं. दुसरं म्हणजे जो निरोप असेल किंवा जो संदेश असेल तो त्यांनी थोडक्यात पण नेमक्या भाषेत मांडण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न करायला हवा. आणि तिसरं म्हणजे त्यांनी ही खात्री करून घ्यायला हवी, की त्यांचा संदेश किंवा निरोप हा दुसऱ्यांनी नीट ग्रहण केला आहे की नाही ? संपर्काची कला ही गोष्ट कार्यसंस्कृतीमधलं एक महत्त्वाचं अंग आहे, न टाळता येण्याजोगं आणि आवश्यक. ३१ । कार्यसंस्कृती