पान:कार्यसंस्कृती.pdf/३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुटीचा शीण मुलांना शाळेतून दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीच्या तारखा जूनमध्येच समजतात. तो सुटीचा वेळ एकत्र मिळवण्यासाठी आपणही आणखी रजा घेतो. रजा सुरू होण्याच्या दिवशीच कुठे तरी सहलीला जातो. कधी कधी तर मुलं सुटीतसुद्धा इतकी गुंतलेली असतात, की शाळेपेक्षा त्यांना सुट्टीतच रिकामा वेळ नसतो. आम्ही हल्ली मुलांना कोणत्याही छंद वर्गाला, शिबिरात न पाठवण्याचा विचार केला आहे. किमान सुट्टीत तरी मुलं वेळेशी बांधलेली नसावीत, एवढाच विचार त्यामागे आहे. रोजच्या पळापळीत आपल्याला कुणालाच अगदी घरच्याबरोबरदेखील निवांत बोलायला वेळ मिळत नाही. सुट्टीत, सहा महिन्यांतून एकदा, एखादा आठवडाभर आपल्या लोकांबरोबर शांतपणे काढण्याची किंमत खूप आहे. न मोजता येण्याजोगी. आपणही रजेवरून कामावर जाताना सहलीमुळे शिणलेल्या अवस्थेत असल्यामुळे कामात मन ओतत नाही. म्हणजे एकूण सुटीत शीण घालवत नाही, तर मुद्दाम धावपळ करून शिणतो. याकडे काळजीपूर्वक बघून सुटीच्या नियोजनाची पद्धत बदलायला हवी. आता दिवाळीची सुटी येईल तेव्हा खूप दिवस राहिलेल्या गप्पा मारायच्या, आपले जुने फोटो पाहायचे. मुलांशी खेळायचं विसरून चालणार नाही. सुटीतला वेळ हा वर्षभर जोमानं मनापासून अभ्यासात लक्ष देण्यासाठी बांधलेला वेळ नसावा. म्हणजे मुलांना भरगच्च रुटीनच्या चक्रात सुटी घालवायला लावायची नाही असा आपला कटाक्ष असायला हवा. कार्यसंस्कृती ३२