पान:कार्यसंस्कृती.pdf/३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वेध बदलण्यासाठी बदल हा सध्याचा परवलीचा शब्द आहे. जग तर बदलतं आहेच; पण आपल्या काम करण्याच्या पद्धती, व्यवसायाचं वातावरण आणि काम करण्याच्या व्यवस्था (सिस्टिम्स) यातदेखील आमूलाग्र बदल होताना दिसत आहे. ज्या संस्था, संघटना आणि व्यक्ती हे बदल सहजपणे अंगीकारतील, तेच बदलत्या स्पर्धात्मक युगात टिकतील आणि बहरतील. जे आहेत तसेच राहतील ते नष्ट होतील किंवा कुचकामी ठरतील. संस्था-संघटनांनी या बदलांचा नीट वेध घ्यायला पाहिजे. भविष्यात काय बदल होणार आहेत. कुठली आव्हानं असणार आहेत, त्यासाठी आतापासून कुठली तयारी करून ठेवणं आवश्यक आहे याची स्पष्ट कल्पना असायला हवी. सध्या हे करण्यासाठी बऱ्याचदा भविष्यवेध शास्त्राचा आधार घेतला जातो, की ज्यामुळं भविष्यातलं चित्र दिसायला मदत होते. बदलणं तर आवश्यक आहेच, प्रश्न फक्त कसं बदलायचं हाच आहे. कार्यसंस्कृती ॥ ३४