पान:कार्यसंस्कृती.pdf/३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चांगल्या टीमचे गुण चांगली टीम करण्यासाठी चांगलं टीमवर्क हवं. चांगल्या टीमवर्कसाठी चांगली टीम बांधलेली हवी. मग चांगली टीम म्हणजे काय ? चांगली टीम जिवंत असते. बाहेरच्या बदलांना प्रतिसाद देणारी, स्वतःची ऊर्जा असणारी, एकसंध, एकजीव समान उद्दिष्ट असणारी, एकमेकांत भरपूर चर्चा करणारी, सर्वांचं ऐकून घेणारी, सगळे मिळून निर्णय घेणारी आणि कामाच्या अंमलबजावणीत खांद्याला खांदा लावून . लढणारी. उत्तम टीमला मजबूत आणि प्रभावी नेतृत्व हवं. टीमसमोर नेमकी उद्दिष्टं हवीत. अगदी कार्यक्षम अशी पद्धती हवी. गटात दोस्तीचं नातं हवं. मैत्रीचा ओलावा हवा. चांगल्या टीममध्ये कला, कौशल्याचं, निपुणतेचं अन् अनुभवाचं वैविध्य हवं. त्यात योग्य समतोल असावा. अन् टीममधल्या सर्वांच्या गुणदोषांची कल्पना असावी. उत्कृष्ट टीम म्हणजे एक शक्तिस्थळ आहे. पण अशी टीम आपसूक उमलत नाही. अत्यंत निश्चयी पद्धतीनं आणि शांतपणे ती बनवावी लागते. घडवावी लागते. ३७० कार्यसंस्कृती