पान:कार्यसंस्कृती.pdf/३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घडवा, बनवा वातावरण काही माणसांमध्ये विलक्षण जादू असते. ती माणसं असली की आसपासचं वातावरण कसं प्रफुल्लित होऊन जातं. काही माणसांचं असं तर काही जागांचं असंच आहे. आमच्या श्यामचं असंच आहे. तो आर्किटेक्ट आहे आणि त्याची बायको ड्रेस डिझायनर एका बंगल्यात तीन खोल्यांत ते दोघं आणि त्यांचा मुलगा असे राहतात आणि बाहेरच्या दोन मोठ्या खोल्या, त्याच्या बाहेरची मोकळी पडवी आणि पसरलेली बाग ही सगळी त्यांच्या कामाची जागा. हे वातावरणच इतकं अफाट आहे की काही विचारू नका. सगळीकडे पसरलेला एक ऐसपैसपणा, मोकळेपणा आणि निवांत, शांत पैस. श्याम आणि रंजना तिथं सुरेख तन्मय होऊन काम करत असतात आणि अफलातून गोष्टी निर्माणही करतात. मलाही कित्येक गोष्टी तिथं सुचल्या आहेत. एक विलक्षण ऊर्जा आहे त्या वातावरणात. उत्स्फूर्तता, आवेग आणि उत्साहू.. पण सांगू, श्यामचं हे ठिकाण आपोआप निर्माण झालेलं नाही. ते घडवलं आहे, बनवलं आहे, जोपासलं आहे. कार्यसंस्कृतीमध्ये वातावरणाचा जागेचा आणि तिथल्या रचनेचा जरूर विचार हवा. मात्र त्यासाठी दृष्टी हवी, चिकाटी हवी आणि अशा उत्साही वातावरणावर श्रद्धा हवी. कार्यसंस्कृती ३८