पान:कार्यसंस्कृती.pdf/४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्ध आणि शांतता सगळीकडे शांतता नांदत असते, तेव्हा युद्ध झालं तर काय म्हणून आपण कवायत करत असतो आणि युद्ध सुरू असताना आपला हेतू असतो शांतता नांदवण्याचा, म्हणजे शांतता असताना युद्धाची चिंता आणि युद्ध करायचं ते शांततेसाठी, अशी आपली गंमत आहे. सर्वसाधारण रुटीन शांतता आणि युद्ध अशा दोन्ही अवस्था असतातच आणि या दोन्हीं अवस्थांमध्ये यथायोग्य अशी आपली वागणूक असलीच पाहिजे हे लक्षात ठेवायला हवं. खूप वेळा कामाच्या ठिकाणी आपल्याला युद्धप्रसंगाला तोंड द्यावं लागतं. कधी कामाला माणसं कमी असतात, थोडक्यांवर ताण असतो, कामं पूर्ण करण्याची डेडलाइन समोर दिसत असते. अशा समरप्रसंगात आपला समतोल कसा राहतो, आपण मोडून तर जात नाही ना ही परीक्षा घ्यायला हवी. शांतता असताना आपण जे 'ड्रिल' करत असतो, त्यात जे सातत्य ठेवतो, त्याचाच उपयोग मग समरप्रसंगात होतो. युद्ध आणि शांततेचं नातं आहे ते असं. कार्यसंस्कृती ४०