पान:कार्यसंस्कृती.pdf/४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कामाची सुरुवात लंडनमध्ये एका कंपनीत मी पंधरा दिवस काम केलं. काम सुरू व्हायची वेळ पावणे- नऊ होती. भारतातून निघताना माझ्या हातात त्यांचं सविस्तर पत्र वेळापत्रकासह आलं होतं. त्यात सकाळी ९ ते ९.०५ व्यवस्थापकीय संचालकांशी भेट असं लिहिलं होतं. मला जरा आश्चर्य वाटलं. उत्सुकतेपोटी दहा मिनिटं अगोदर पोचलो. ऑफिसच्या वेळेपूर्वी सगळं ऑफिस जोरात कामाला लागलं होतं. वाजले होते आठ पन्नास मी भेटलो ते माझं काम खरं म्हणजे चार मिनिटांत झालं. एक मिनिट इतर विषयांवरही बोललो. जे बोलायचं होतं त्याचं टिपण आणि मुद्दे लिहून समोर ठेवलेले होते. पुढे पंधरा दिवसांत प्रत्येक जण पावणेनऊ ह्या ऑफिस सुरू होण्याच्या अगोदर किमान १० मिनिटं आलेला पाहिला. दहा मिनिटांत टेबल आवरून पावणेनऊला कामाची प्रत्यक्ष सुरुवात. आपण पाहतो अनेक ऑफिसात प्रत्यक्ष कामाची सुरुवात सुमारे अर्धा तास उशीरा होते. साधारण पंधरा जणांच्या ऑफिसात अर्धा तास काम उशीरा सुरू होतं. प्रत्येकाचा कामाचा वेग जरी वेगळा असला, तरी कामाची सुरुवात वेळेवर करण्याची आपली सवय असायला काय हरकत आहे? कार्यसंस्कृती ४४