पान:कार्यसंस्कृती.pdf/४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दोन रचना दोन प्रकारच्या कामाच्या रचना असतात. एक असते त्यात काम करणाऱ्यांना उत्साह देणारी अन् मोठं करणारी दुसरी असते त्यात काम करणाऱ्यांची शक्ती शोषणारी अन् त्यांना खुजंच ठेवणारी आमच्या विजूचं ऑफिस दुसऱ्या प्रकारचं आहे. अगदी सकाळपासून तिथं कामाची गती पकडली जाते. धावपळ चालू असते. माणसं कामाला जुंपली जातात. कान जास्त की पैसे जास्त असा साधा आणि सोपा हिशोब आहे. तिथं काम करणारी माणसं कंटाळली किंवा त्यांना पगार कमी पडायला लागला की ती सोडून जातात. मग दुसरी माणसं. विजूदेखील आता कंटाळायला लागला आहे. कामात तोचतोपणा आहे. शिकायला नवीन मिळत नाही. बढती मिळेल, नवं अधिक आराम असलेलं काम मिळेल अशी शक्यता नाही. अशा अवस्थेत काम चालू आहे. विजूचं कार्यालय म्हणजे शक्तिहीन, ऊर्जाहीन कार्यस्थळ आहे. माणसांना त्यांच्यातील कर्तृत्वाला शोषून घेणारं, मोकळं, अधिक मुक्त, आनंदी, खेळीमेळीचं, सर्वांना प्रगती करायला वाव असणारं कार्यस्थळ ते नाही, मुळीच नाही. आज ना उद्या विजू सोडून जाणार. उत्साह देणाऱ्या नव्या कामाच्या रचनेच्या शोधात. कार्यसंस्कृती ४६