पान:कार्यसंस्कृती.pdf/४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उत्साह देणारे वीर एला व्हीलर विलकॉक्स नावाच्या कवयित्रीची एक अप्रतिम कविता आहे. ती म्हणते- "आज जगात दोन प्रकारची माणसं आहेत. फक्त दोनच प्रकारची, जास्त नाही, मी म्हणते. काही चांगले, काही वाईट असे फरक मी करत नाही. कारण चांगले अर्धे वाईट अन् वाईट अर्धे चांगले. दोन प्रकारची माणसं म्हणताना माझा अर्थ वेगळा आहे. काही दुसऱ्यांना उंच उचलणारे अन् काही त्यांना वाकायला लावणारे आहेत." कामाचं ठिकाण म्हणजे एक समरांगण असतं. तिथं काही एकटे शूर असतात. तर काही कुणाच्या मागे लपणारे वीर. मात्र दुसऱ्यांना चेतना देणारे, उत्साह देणारे, धीर वाढवणारे, फार म्हणजे फार थोडे असतात. अशी दुसन्यांचं कौतुक करणारी आणि उत्तेजन देणारी माणसं कामाच्या ठिकाणी विरळा असतात. मात्र ती असली तर त्यांचा मान ठेवावा, त्यांना वाव द्यावा. कामाचं ठिकाण पावन करण्याची क्षमता त्यांच्यात असतेच असते. कामाच्या ठिकाणची 'संस्कृती' त्यांच्यामुळे टिकतेच टिकते. ४७ कार्यसंस्कृती