पान:कार्यसंस्कृती.pdf/५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शेवट जवळ आलाय? जॉन हल्ली घरी आला तरी कुणाशी न बोलता टेलिव्हिजनची चॅनल्स भराभर फिरवीत राहतो. त्याचं कुठंच लक्ष नाही असं अलीकडे फार वेळा होतं. सांगितलेले निरोप विसरतात. सकाळी जागं झाल्यावरही थकलेलाच दिसतो. जेवायच्या सुट्टीत पूर्वीसारखा मनापासून जेवत नाही. त्याला आम्ही बरीच वर्षं पाहतोय. त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी विचारही केलाय. जॉनला लवकर नोकरी लागली आणि भराभर प्रमोशन मिळविण्यासाठी तो काम एके काम असंच करत राहिला. जेवण, झोप, करमणूक या गोष्टींना काही स्थान न ठेवल्यामुळे तो आतून संपत चाललाय असं लक्षात येत होतं. उत्साहानं जेवणारा, विनोद सांगणारा जॉन एवढ्यात ढासळला कसा ते लक्षात येत गेलं. अशा अवस्थेआधी आपल्या स्वतःच्या कुवतीबाहेर तर आपण जात नाही ना हे तपासून पाहण्याची सवय लावयला हवी. काम आणि आराम या पाठशिवणीच्या खेळाची जपणूक व्हायला हवी. बरेच दिवस कुठलाही आराम न करता, सतत काम केल्यामुळे आतून तुम्ही संपत जाल. मनाची उभारी येण्यासाठी एक यंत्रवत काम राहू नये असा प्रयत्न जॉनला करायला हवा आहे. त्याचा शेवट जवळ येताना आम्ही पाहात राहू शकत नाही. त्यालाच त्यातून बाहेर यायला हवं. मित्र म्हणून जागं करण्यासाठी आम्ही मात्र ठरवलं आहे, की शेवट जवळ येता कामा नये, ४९ । कार्यसंस्कृती