पान:कार्यसंस्कृती.pdf/५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खरं बोला की क्वचित केव्हा तरी फोटो काढण्याची कामं असतात आणि लोक रेणुकाला फोन करतात. फोन केल्यावर मग ती माणसं त्या कामाचं वर्णन करतात आणि काम सोपं आहे हे तिला पटवण्याचा प्रयत्न करतात. हेतू हा की रेणुकानं खर्चाचा अंदाज कमी करावा. रेणुका हे असे प्रकार नेहमी येऊन मला सांगत असते आणि त्यानंतर मग त्यावर हसण्याचा आमचा कार्यक्रम असतो. माणसं ठार खोटंच बोलत असतात. काम साधं आहे. सोपं आहे म्हणून त्या कामाची किंमत कमी करत असतात. मनातून त्या पवित्र अशा कामाचा पाणउतारा करत असतात. कॅमेरा आहे, त्यात रोल आहे आणि मग फक्त क्लिक करायला कसले आलेत शंभर रुपये असं म्हणून त्या रेणुकाला क्लेष देतात. खरं पाहिलं तर रेणुका महान छायाचित्रकार आहे. तुम्हा-आम्हाला जे दिसू आणि कळू शकत नाही ते तिला सापडतं. पण तरीही लातूर काही मुंबईहून फार लांब नाही, असं जायचं अन् दहा-बारा फोटो काढून माघारी परतायचं असं खोटं ब्रीफिंग तिला कुणीही देतं. कार्यसंस्कृतीच्या या युगात खरं बोलण्याची सवय आपण कधी लावून घेणार हेच कळत नाही. कार्यसंस्कृती ५०