पान:कार्यसंस्कृती.pdf/५४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शुद्ध चित्त ह्यूलेट पॅकार्ड हे नाव आज जवळ जवळ सर्वांना माहीत आहे. कॉम्प्युटर्स असलेल्या कार्यालयामध्ये 'एच पी' अशी अक्षरे असलेले प्रिटर्स दिसतातच दिसतात. ही एच पी कंपनी स्वतःच्या मालाच्या गुणवत्तेविषयी एक विलक्षण जागरूक कंपनी म्हणून मानली जाते. या कंपनीत काम करणारे लोक याचं श्रेय कंपनीच्या कार्यसंस्कृतीला देतात आणि या कार्यसंस्कृतीचा आधार असलेल्या तत्त्वांना ते विलक्षण मानतात. एकदा हे तत्त्व काय आहे, असं विचारल्यावर एच पी मधील एका अधिकान्यानं सांगितलं, की एखादी समस्या असेल तर तिच्याकडे कानाडोळा करू नका. भिडा त्या समस्येला शुद्ध चित्तानं आणि शोधा त्यावर उत्तर, आणि कंपनीत कुणीही तुम्हाला एखादं काम करतो म्हणून म्हणत असेल तर ते तो फक्त शब्दांत म्हणतोय की मनापासून शुद्ध चित्त ठेवून म्हणतोय ते नीट शोधा. कामाची बांधिलकी नुसत्या कोरड्या शब्दांनी उपयोगाची नाही, त्यात शुद्ध मनानं, विशुद्ध अंतःकरणानं दिलेला होकार हवा. ५३ । कार्यसंस्कृती