पान:कार्यसंस्कृती.pdf/५९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एक कठोर आवरण डॉक्टर अडिगा म्हणजे शहरामधलं एक महत्त्वाचं नाव. त्यांचं क्लिनिक सतत भरलेलं आणि पेशंटसची गर्दी असलेलं. कधी कुणी अत्यवस्थ पेशंट येतो तर कुणी परगावाहून आलेली मंडळी, रांगेत थांबणाऱ्या प्रत्येकाला घाई, आपला नंबर लवकर यावा म्हणून प्रत्येकाची धडपड. ती गर्दी चालेल एक वेळ; पण बाहेर बसलेल्या रंजनाबाईशी पंगा नको असं मला नेहमी वाटतं. मलाच काय पण तिथं येणान्या प्रत्येकाला रंजनाबाईंची भीती वाटते. दडपण वाटतं. रंजनाबाई चेहऱ्यावरूनच दिसतात विलक्षण कडक. गंभीर मुद्रा आणि कुणालाही मध्ये घुसू न देण्याची त्यांची अतीव धडपड. 'अहो किती वेळ बसायचं? डॉक्टरांनी मागच्या पेशंटला किती तरी वेळ पाहिलं,' असे उद्गार ऐकूनदेखील आत काम करत असणाऱ्या डॉक्टर अडिगांना शांतपणे काम करायला देण्याची रंजनाबाईंची पद्धत कौतुकास्पद आहे. रंजनाबाईंसारखी भक्कम भिंत आणि पोलादी वातावरण असल्यानंच डॉक्टर शांतपणे काम करू शकतात. डॉक्टरांचं नाव होतं; पण रंजनाबाईंना टीका सहन करावी लागते, मनस्ताप होतो; पण रंजनाबाईंना त्याचं विशेष वाटत नाही. त्यांना माहीत आहे; बाहेरचे हल्ले परतवणं हेच त्यांचं काम आहे. रंजनाबाई आहेत म्हणूनच डॉक्टर आहेत, काम करू शकताहेत असं माझं मत आहे. कार्यसंस्कृती ५८