पान:कार्यसंस्कृती.pdf/६०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निरोपांचे कोनाडे विजयच्या ऑफिसची मला नेहमीच गंमत वाटते. एका छोट्या फायनान्स कंपनीत विजय अधिकारीपदावर काम करतो. साधारण वीसेक जण तिथं काम करतात. त्याचं ऑफिस एका मोठ्या हॉलमध्ये आहे. म्हणजे इतरही छोट्या केबिन्स आहेत; पण मुख्य काम मोठ्या हॉलमध्ये. त्या हॉलमध्ये अगदी बरोबर मधल्या भागात एक दार नसलेलं कपाट आहे. आणि त्या कपाटात त्या ऑफिसमध्ये काम करत असणाऱ्या प्रत्येकाच्या नावाचे कोनाडे आहेत. कुणालाही, कुठलाही छोटासा जरी निरोप द्यायचा तर त्या कोनाड्यात एका छोट्या कागदावर तो निरोप लिहून ठेवून द्यायचा. आरडाओरडा नाही की गडबड नाही. त्यासाठी उगीचच फोनाफोनी नाही. अगदी साधा अन् सरळ उपाय. विजयच्या ऑफिसचे सगळे तिथं अगदी मधोमध असणाऱ्या त्या कपाटाला मजेत 'कम्युनिकेशन टॉवर' असंही म्हणतात. लक्षात ठेवण्याचा त्रास नाही की 'अरे विसरलो' असं म्हणून सॉरी म्हणायची पाळी नाही. साधा, सरळ आणि सोपा उपाय. दिवसातून दोन-तीनदा जायचं अन निरोप द्यायचे किंवा घ्यायचे. पुन्हा आपली कामाला सुरुवात. ५९ कार्यसंस्कृती