पान:कार्यसंस्कृती.pdf/६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाय जमिनीवर आठवड्यातून तीन दिवस कॅसल नावाच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना सकाळी गुलाबी रंगांचं एक छोटं पाकिट मिळतं. त्यावर लिहिलेलं असतं. 'जमिनीवर पाय.' या पाकिटात दोन नावं आणि त्यांचे फोन नंबर्स असतात आणि त्या सर्व अधिकाऱ्यांनी त्या माणसांना फोन करून एक प्रश्न विचारणं आवश्यक असतं. तो प्रश्न- 'आमचं साहित्य तुम्हाला कसं वाटतं?' कॅसल कंपनी हॉस्पिटल उपकरणं बनवते आणि ती उपकरणं जी माणसं प्रत्यक्ष वापरतात त्यांचेच फोन नंबर्स असतात. प्रश्न विचारणारी माणसं मात्र कॅसल कंपनीतली वेगवेगळ्या विभागातील माणसं असतात. मार्केटिंग, प्रॉडक्शन किंवा वित्त विभागातील आठवड्यातून तीन दिवस दोन दोन माणसांशी बोलून कंपनी काम करते. त्यांचं मत आणि अनुभव ऐकून घेण्याचाही यामध्ये प्रयत्न आहे, त्यातून ग्राहकाला महत्त्वाचं स्थान दिलं जातं आणि ‘आपण कुठं आहोत?' हे कंपनीच्या अधिकाऱ्यांना रोजच्या रोज समजतं. ६१ कार्यसंस्कृती