पान:कार्यसंस्कृती.pdf/६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मीटिंगची पंचतंत्रं आपलं काम कुठल्याही प्रकारचं असलं तरी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मीटिंग्जना तोंड द्यावं लागतं. कधी या मीटिंग्ज विलक्षण कंटाळवाण्या तर कधी विलक्षण अर्थहीन अशा होतात. आपल्याला एकूणच मीटिंग्ज कशा घ्याव्यात याचं प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. कुठलीही मीटिंग चांगली व्हायची असेल, तर त्यासाठी पाच गोष्टींचा नीट विचार होणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे मीटिंगचा विषय सुनिश्चित आणि सुस्पष्ट असावा. दुसरी गोष्ट म्हणजे मीटिंग कशी चालवायची आहे, याची जाण मीटिंगमध्ये भाग घेणाऱ्या सर्वांना असावी आणि त्यात एकवाक्यता असावी. तिसरी मीटिंगमध्ये कुणी तरी एकानं सर्व संभाषण मोकळं आणि समतोल राहावं याची काळजी घ्यावी, आणि चौथी गोष्ट म्हणजे कोणी तरी ही जबाबदारी घ्यावी की कुणावरही व्यक्तिगत हल्ला केला जाणार नाही. पाचवी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीटिंगमध्ये भाग घेणाऱ्या सर्वांच्या भूमिका आणि जबाबदान्या स्पष्ट असाव्यात आणि सर्वांना मान्य असाव्यात. मीटिंगच्या या पाच नियमांचा विचार कायम मनात असावा. ६३ कार्यसंस्कृती