पान:कार्यसंस्कृती.pdf/६५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कार्यगटाचे तीन गुण व्यवस्थापन शास्त्रातले जगभरातले विचारवंत एका प्रश्नाभोवती घुटमळताना सध्या द आहेत. छोट्या आणि सुटसुटीत गटामध्ये काम चांगलं होतं, जोरात होतं हे मत आता जगन्मान्य झालं आहे. जगव्याळ यंत्रणा काहीही कामाच्या नाहीत आणि छोटेखानी गटांच्या सुसूत्र साखळीतून मोठ्या कामांचा आग्रह धरला पाहिजे हाही आता रूढ झालेला विचार आहे. पण छोटं म्हणजे कमकुवत नाही आणि सुटसुटीत म्हणजे पातळ पाणी घातलेलं नाही हे समजायला मात्र फार अवघड होतं आहे. खरं म्हणजे छोटा आणि सुटसुटीत असा कार्यगट हा नेमक्या विषयावर एकाग्र, त्या विषयाबाबत अधिक संघटित, विचारी असायची गरज आहे. पण होतो घोटाळा असा की छोटा गट कृश आणि शक्तिहीन व पांगळा राहतो. उदाहरणार्थ महानगरपालिकेच्या कचरा विभागाचा तंत्रज्ञांचा गट असेल तर त्या गटाला जगातल्या सर्वोत्तम प्रयोगांची साद्यंत माहिती हवी, त्याची जाण हवी; पण आपल्याकडे हा गट म्हणजे जुळवाजुळव केलेला बनावट गट असतो. त्याची रचना आपण उत्तम रीतीने बनवत नाही. छोट्या कार्यगटांची अचूक बांधणी म्हणूनच आवश्यक आहे. नेमक्या विषयावर एकाग्र, सुसंघटित आणि विचारी हे त्याचे गुण आहेत. कार्यसंस्कृती । ६४