पान:कार्यसंस्कृती.pdf/६८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भेळेची गाडी त्या कॅनॉलच्या रस्त्याच्या कडेला त्याची भेळेची गाडी लावलेली असते. संध्याकाळच्या वेळेला तिथं तीस चाळीस तर कधी पन्नासपर्यंत माणसं उभी असतात. कुणी तिखट भेळ, तर कुणी कोरडी भेळ, कुणी रगडापुरी तर कुणी पाणीपुरी, कुणाला गोड तर कुणाला जास्त पाणी. तो स्वतः, त्याच्या डावीकडे भेळ बनवणारा, एक पाणीपुरी देणारा, दोघे जण बॅक अप, एक ताटल्या उचलून बादलीत ठेवणारा किंवा बाकी तयारी करणारा, एक जण गाडीत बसूनच भेळ खाणाऱ्यांना हवं नको ते बघणारा, सहावा पाणी देणारा, गॅसबत्ती नीट ठेवणारा. सहा जणांची टीम; पण अफलातून धंदा करतात. कुठंही गडबड नाही, गोंधळ नाही, आदळआपट नाही, भांडण नाही की चढा आवाज नाही. चेहऱ्यावरचं हसू ठेवत, प्रत्येक गिन्हाइकाची राजी खुषी बघत त्याचं काम चालू असतं. मला तर त्याचा तो शांत आणि प्रसन्न चेहरा पाहून तो एक योगीच असावा असं वाटतं. गाडी उत्तम तऱ्हेनं लावलेली. काय हवं, काय नको आणि किती हवं याचा नेमका अंदाज केलेला. टीममधल्या प्रत्येकाला त्याचा त्याचा रोल 'पक्का' माहीत, त्या कामात ते वाकबगार, कार्यपद्धती सुरेख बसवलेली. सुंदर कार्यसंस्कृतीला आणखी काय हवं? ६७ कार्यसंस्कृती ..