पान:कार्यसंस्कृती.pdf/७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

1 थोरपणाचा पाळणा इसवी सन १९६२ मध्ये अमेरिकेत एक फार महत्त्वाचा अभ्यास केला गेला. हा अभ्यास केला होता विल्फ्रेड आणि मिल्ट्रेड गोट्झेल या दांपत्यानं. त्यांनी अमेरिकेतील ४१३ अत् यशस्वी माणसांच्या सविस्तर मुलाखती घेतल्या आणि नंतर 'थोरपणाचा पाळणा' या नावानं त्यांनी तो प्रकाशितही केला. अत्यंत यशस्वी आणि कीर्तिमान माणसं हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता आणि त्या सर्व ४१३ माणसांच्या जीवनाच्या अभ्यासातून त्यांना एक समान धागा सापडलाच सापडला आणि तो धागा होता अत्यंत प्रतिकूल आणि विपरीत परिस्थितीचा आणि त्याही स्थितीत त्या सर्वांनी आपापल्या सामर्थ्यावर, अफाट मेहनत घेण्याच्या कार्यपद्धतीच्या शक्तीनं मात केली. जितकी परिस्थिती प्रतिकूल तितकी कार्यपद्धती चांगली, जितका त्रास अधिक तितक्या तो कमी व्हावा म्हणून युक्त्या अधिक अशी परिस्थिती त्या सर्वांच्या बाबतीत झालेली दिसते. थोरपणाचा पाळणा हा विपरीत परिस्थितीतून सुरू होतो खरा; पण त्या उत्तम कार्यप्रणालीच्या आधारे माणसं थोरवीही प्राप्त करताना दिसतात. विपरीत परिस्थितीचा उपयोग होतो तो असा. ७१ कार्यसंस्कृती