पान:कार्यसंस्कृती.pdf/७७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लोकांसमवेत अडचणी आपल्याला कायम लोकांबरोबर काम करावं लागतं. आपण खूप प्रयत्न करतो; पण लोकांच्या अगदी निकट होऊन आपण काम करूच शकत नाही. असं होतं तेव्हा त्याचं मूळ शोधावं. कारणं तपासावीत. आपली वृत्ती पाहावी. १) बाकीचे कायम दोषी असतात, मी कधीच नसतो. २) मीच दोषी असतो कायमच. ३) माझा लोकांवर विश्वास नाही. ४) माणसं मुळात अवलंबून राहण्याच्या लायकीची नसतात. ५) मी एकटा सारं पाहून घेईन, मला कुणाची गरज नाही ६) लोकांना माझं पटत नाही, कारण ते निर्बुद्ध आहेत. ७) माझ्या आसपासच्यांपेक्षा मी खूप वरचा आहे. ८) या ग्रुपबरोबर राहणं मला शोभत नाही. ९) माणसं एकत्र येऊन काही करू शकतात यावर माझा विश्वास नाही. १०) माझ्या मनात काय आहे हे मी कधीही या ग्रुपला सांगणार नाही. वर दिलेल्या दहा वाक्यांपैकी काही वाक्यं आपल्या मनात उमटत असतील तर आपण ग्रुपमध्ये काम करायला जरा कठीण आहोत असा निष्कर्ष काढलेला बरा. कार्यसंस्कृती । ७६