पान:कार्यसंस्कृती.pdf/८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अचूक काही काही गोष्टींची आराधनाच करावी लागते, नव्हे त्याचा ध्यासच घ्यावा लागतो. कारण त्याशिवाय काही गोष्टी हातालाच लागत नाहीत. बिनचूकता आणि अचूकता ही गोष्ट तशीच. एखादी गोष्ट कधी तरी बिनचूक करणं वेगळं आणि बिनचूकता हा एक अंगभूत गुण बनवणं, एक स्वभाव बनवणं संपूर्णपणे वेगळं. लक्षात घ्या, स्वभावतःच बिनचूकता अंगात भिनवता येईल काय? त्यासाठी काय करता येईल? अचूक टप्प्यावर कायमच गोलंदाजी करणारा खेळाडू क्रिकेटमध्ये जे करतो तेच करायचं. प्रत्येक चेंडू अचूक टप्प्यावर टाकण्याचाच प्रयत्न करायचा. प्रत्येक चेंडू अचूक, प्रत्येक गोष्ट अचूक, अचूक आणि अचूकच. प्रत्येक गोष्ट अचूकच करायची सवय लागली, की मग अचूकता अंगात भिनायला लागते. अनेकदा अनेक वर्ष, वारंवार अचूकतेचा ध्यास घेत राहिलं की अंगातून व्यक्त होते ती फक्त अचूकताच. प्रत्येक गोष्ट अचूकच. गाडी चालवणं अचूक. पत्राचं ड्राफ्टिंग अचूक, कॅमेन्याचा अँगल अचूक. आयुष्याचा अँगलही अचूकच. ७९ ८ कार्यसंस्कृती