पान:कार्यसंस्कृती.pdf/८४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्यक्तिगत नोंद सुमारे पाच वर्षांपूर्वी माईक आणि मी एकाच संस्थेत काम करत होतो. माईक तसा पोस्टनं बराच सीनिअर होता. काही वर्षांनी मग आमचं काम सोडून त्यानं संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका विभागाचं प्रमुखपद सांभाळायला सुरुवात केली. आज साधारण पाच वर्षांनंतर मी त्याला भेटत होतो. मी आत शिरलो तर मोठ्या उत्साहानं त्यानं माझं स्वागत केलं. मी काय केलं, काय करतो आहे, याविषयी बारकाईनं चौकशी त्यानं केली. आणि माझ्या वडिलांच्या पायाचं सध्या बरं आहे का तसंच धाकटी मुलगी अजूनही गिटारचा रियाज करते का असं जेव्हा त्यानं मला विचारलं, तेव्हा मी साफ उडालोच. या बेट्याच्या इतकं लक्षात कसं याचं आश्चर्य करत राहिलो. दोन दिवस मी त्याच्या कार्यालयात होतो. त्या अवधीत मात्र सगळा उलगडा झाला. माईकची नोंद ठेवण्याची पद्धत अफाट होती. त्याच्या सेक्रेटरीनं सांगितलं की त्याला भेटणाऱ्या प्रत्येक माणसाची छोटी फाईल तो बनवतो. त्यात माहिती भरत राहतो. मी आश्चर्यचकित तर झालोच; पण माईकच्या कर्तबगारीचं एक रहस्यही त्यामुळे मला समजलं. ८३ कार्यसंस्कृती