पान:कार्यसंस्कृती.pdf/८६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झोपेची कला ज्याला उत्तम काम करायचं आहे, त्याला विश्रांतिमय झोप आवश्यक आहे. नुसती झोप नाही बरं का, विश्रांतिपूर्ण झोप. स्वच्छ, सुंदर आणि निकोप झोप. शांत, उत्साह देणारी आणि संपूर्ण झोप. शरीराला पुन्हा नवी ऊर्मी देणारी आणि आपल्या स्वप्नांना आपल्या मनातील • खोल खोल कवाडं उघडी करून टाकणारी झोप. उत्तम झोप नाही तर उत्साही काम नाही. पुरेशी झोप नाही तर संपूर्ण शक्तिस्रोत नाही. झोप अर्धवट म्हणजे बॅटरी अपुरी चार्ज. कित्येक माणसं असं मानतात की खूप काम करणं म्हणजे सर्वप्रथम कशाला कात्री • लावायची असेल तर ती झोपेला. झोप मारून जी माणसं काम करतात ती माणसं आपला वेळ अंतिमतः वाचवत नाहीतच, फक्त थोड्या वेळासाठी, तात्पुरतं, जुजबी समाधान करून घेतात. झोप माणसाला तरुण ठेवते. शरीराला उल्हसित अन् मनाला हुरूप देते. उत्तम काम साधायचं तर झोपेची कला जमायलाच हवी. ८५ कार्यसंस्कृती