पान:कार्यसंस्कृती.pdf/८७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कार्यअसंस्कृती संस्कृती मूल्यांमध्ये असते. संस्कृती ही वागण्यातून दिसते, व्यक्त होते. कार्यसंस्कृतीदेखील वागण्यातून समजते, जाणवते. आपल्या कामाची, आपल्या संस्थेची ओळख, तिच्या मूल्यांची जाण, अशीच आपल्या वागण्याबोलण्यातून व्यक्त होत राहते. प्रतीत होते. त्या सर्वांचं तसंच आहे. दुसऱ्याचा विचार न करणारी एक प्रकारची बेदरकार प्रवृत्ती त्या सर्वांच्या नसानसात भिनलेली आहे. दिल्लीच्या त्या गजबजलेल्या रस्त्यावरून त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आम्ही निमंत्रित म्हणून पोचलो तर आमच्या आधी पाच-सातशे निमंत्रित असेच ताटकळत उन्हात लांबलचक रांगेत उभे होते. कार्यक्रम उत्तम होता. निमंत्रणपत्र अत्यंत व्यवस्थित, नम्र भाषेत, छान कागद वापरून उत्तम छपाई केलेलं आणि सुरेख पद्धतीनं पेश केलेलं होतं. तिथलं वागणं मात्र सुसंगत नव्हतं. थिएटर मिळायचं म्हणून आम्ही अजून थोडी वाट पाहून कंटाळून निघून गेंलो. बेदरकार, बेगडी, खोटी, उर्मट अशी ही संस्कृती. कार्यअसंस्कृती. कार्यसंस्कृती ८६