पान:कार्यसंस्कृती.pdf/९०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जाण दुसऱ्याची केव्हा तरी रात्री सव्वाअकरा वाजता अजय मला दिल्लीहून फोन करतो. मी अर्धवट झोपेत असतो, फोन असतो तो कुठला तरी फोन नंबर विचारण्यासाठी किंवा कुठला तरी पत्ता विचारण्यासाठी. कधी बंगलोर विमानतळावरूनही अजयचा फोन असतो आणि कुणाला तरी फोन करून अजयचं काम करावं अशी त्याची इच्छा असते. मी तसं करतोही; पण काम झालं की अजयचा पत्ता नसतो. खरं म्हणजे आमच्या दोघांचीही कार्यालयं आहेत अगदीच जवळ, सहज चहा प्यायला डोकवता येईल इतक्या नजीक; पण काम नसेल तर अजयला तुमची आठवणसुद्धा येणार नाही. माझ्या फोनमुळे त्याचं काही काम झालं असलं, तरी तो मला कळवत नाही, नाही झालं तरी सांगत नाही. धन्यवादाचा साधा शब्द नाही की आपला मित्र आपल्या अगदी वेळेला उपयोगी पडला याची फिकीर नाही. अजयच्या वागण्यात काम करण्याच्या पद्धतीत एक खोल स्वार्थीपणा तर आहेच; पण दुसऱ्याबद्दलची जाणीवही नाही. सतत स्व - केंद्री असणारा अजय म्हणूनच कोणाचाही दीर्घकालीन साथीदार राहू शकत नाही. ८९ । कार्यसंस्कृती