पान:कार्यसंस्कृती.pdf/९२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कार्यक्षमतेची त्रिसूत्री तुमच्या कार्यक्षमतेचं रहस्य काय? असं मी कन्ननला विचारलं तर तो म्हणाला, 'एक तीन आठ'. मी समजलो नाही. हे 'एक तीन आठ' काय प्रकरण आहे असं मी त्याला विचारलं. तर तो म्हणाला. 'दररोज एक तास व्यायाम, तीन वेळेला वेळेवर जेवण, आणि आठ तास पूर्ण विश्रांती." मी हसलो आणि म्हणालो, "नाही रे, मी कार्यक्षमतेविषयी विचारतो आहे." तर म्हणतो, 'हो, एक तास योग्य तो व्यायाम झाला आणि तीन वेळेला वेळेवर योग्य आहार घेतला की मग बाकी चिंता करायची गरज नसते. गोष्टी आपोआपच होत जातात.' मला गंमत वाटली. व्यायाम, आहार आणि विश्रांती ही मला कार्यक्षमतेची त्रिसूत्रीच वाटली. एक शरीराची तयारी, एक शरीराचं पोषण, आणि आठ तासांचा सुरेख विश्राम, तीन गोष्टींचा अद्भुत संगम, कार्यक्षमतेची त्रिसूत्री. ९१ । कार्यसंस्कृती