पान:कार्यसंस्कृती.pdf/९६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आठवणींचा फलक माझ्या शेजारच्या सहस्रबुद्धेच्या घरची किल्ल्या ठेवण्याची जागा म्हणजे कल्पनाशक्तीची परिसीमा आहे. एका मोठ्या फळ्यावर चारी बाजूंनी खुंट्या आहेत आणि तिथं ही मंडळी स्कूटरच्या किल्ल्या, लॉकरच्या किंवा ऑफिसच्या किल्ल्या ठेवतात. जिथं किल्ल्या ठेवतात तिथंच रोपही लिहून ठेवलेले असतात. अगदी लोडशेडिंगच्या वेळापत्रकासह 'श्रद्धा, गॅस संपला, फोन कर' 'संध्याकाळी सफरचंद आणा' असे निरोप तिथं वाचायला मला नेहमीच मजा वाटते. त्या फळ्यावर लिहून ठेवलेले निरोप म्हणजे त्या घरात चाललेल्या धावपळीची चिन्हं आहेत असंच मला वाटतं. पण ही युक्ती कमाल आहे. आरडाओरड नाही की धावपळ नाही. गोंधळ नाही की गडबड नाही. निरोप सांगण्याचा प्रश्न नाही. किल्ली उचलताना फक्त फळ्यावर नजर टाकली की झालं. संपूर्ण दिवसभर ये-जा चालू असताना आणि कामाच्या धावपळीत असताना सहस्रबुद्धेकडे निरोपांचा गोंधळ झाल्याचं ऐकिवात नाही. कामाची सुयोग्य यादी डोळ्यासमोर हेच त्याचं कारण असावं. ९५ कार्यसंस्कृती