या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दिल्ली.


 ज्ञानप्रकाशकर्ते यासः -

 वि० वि०. गेल्या पत्रों आपणाकडे श्री मथुरा क्षेत्राची हकी- कत लिहून पाठविली त्या वेळीच तिकडील पोलिसाची वगैरे व्यवस्था कोणत्या प्रकारची आहे याबद्दल पुढे लिहू म्हणून लिहिले होतें, परंतु त्याजबदल एकंदर हकीकत पुढे लिहून कळवीन. आतां आपणाकडे दिल्ली शहरची हकीकत लिहून पाठवितों ती कृपा करून छापाल अशी आशा आहे.

 दिल्ली शहरांत आम्ही ईस्ट इंडिया रेल्वेच्या स्टेशनावर किल्यांत उतरलो. हें स्टेशन फार मोठे आहे. इकडील स्टेशनाप्रमाणे स्टेशनें मुंबई इलाक्यांत नाहीत. विटेबंदी काम असून स्टेशने उंच उंच बांधिलेली आहेत. व सगळ्याकडे कमानीदार दरवाजे व खुल्या मोठमोठाल्या कमानी आढळतात. रेल्वे स्टेशनाजवळच एक मोठी धर्मशाळा आहे. तिला मुरची सराई म्हणतात.ह्या सराईत मुशाफर लोकांस उतरण्याची साथ चांगली आहे.खाल- च्या मजल्यांत ज्या कोठडया आहेत त्यांत उतरल्यास दर माणसी एक पैसा दररोजचें भाडे पडते व वरील मजल्याच्या कोठडीत उतरले तर दर कोठडीस दररोज आठ आणे भाडे पडतें.ह्या धर्मशाळेत एक कुत्रा आहे त्यांचे पाणी फारच चांगले आहे. धर्म शाळेच्या मागच्या अंगास यमुनेचा नहर बांधून आणिलेला आहे. ह्याप्रमाणे मुशाफराच्या सोयी फार चांगल्या आहेत.

 हे शहर दिल्लीच्या पादशहाच्या वेळी फारच नांदतें असावे असे अनुमान होतें.हल्ली ते अगदी मोडकळीस आले आहे तरी मुंबईच्या जवळ जवळ बरोबरीचे आहे. आम्ही सुमारे सहा रस्ते मोठ मोठाले दक्षिणोत्तर व तितकेच पूर्व पश्चिम फिरलो. तितक्यां- तून दुमजला तीन मजला अशा हवेल्या आढळल्या.व तितक्या हवेल्यांतून दुकानें व बिदाडे गच्च भरलेली आढळली.