या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रांतांतील शहरांची व पंजाबांतील शहरांची माहिती लिहून पाठवि प्यास उमेद आली आहे. ती यथामती लिहितो. तिला कृपा करून आपल्या येत्या अंकी जागा द्यावी.

 हरिद्वार हे गांव म्हटले म्हणजे लहान आहे खरें, परंतु येथेही इमारती मोठ मोठाल्या आहेत. हें गंगेच्या काठी वसलेले आहे. हे सुमारे २ मेल लांब असून एक मैल रुंद आहे. येथे मोठ मोठ्या राजे रजवाडयांनी लाखो रुपये खर्चून धर्मशाळा बांधिल्या आहेत. येथे हरिद्वार म्हणजे बद्रिनारायणास जाण्याची वाट अथवा हरिद्वार म्हणजे बद्रिकेदारास जाण्याची वाट अथवा गंगाद्वार म्हणजे गंगोत्रीस जाण्याची वाट अथवा मोक्षद्वार म्हणजे ह्या मार्गाने पांडवांनी स्वर्गारोहण केले म्हणजे स्वर्गास जाण्याची वाट अशी ह्या गांवास वेगळाली नावे आहेत.

 येथे आम्ही हिवाळ्यांतच आलो म्हणून थंडी आम्हास बरीच लागली.काय सांगावें एडिटरराव, आम्ही बर्फ पुष्कळ वेळां खाल्ले आहे व ते अतिशय थंड असते खरे, परंतु लंवडीचें तें पानचट लागतें आणि येथील गंगोदक त्यापेक्षांही गार असून अत्यंत रुचकर आणि पाचक असे आमच्या अनुभवास आले. येथून तीन मैलांवर सप्तश्रोत म्हणजे सात ऋषीनों अनुष्ठान केले ती जागा गंगेच्या काठीच आहे. तेथें गंगेचे पाट काढण्याकरितां इंग्रजांनी पाहिले धरण बांधिले आहे. त्या नंतर दुसरा बंधारा हरिद्वारास बांधिला आहे. येथून सुमारे २५ मैल पश्चिमेस रुड़की म्हणून एक मोठे शहर आहे.तेथे गंगेच्या पाटांत चक्रे लाविली आहेत आणि त्यावरून हजारों यांत्रिक कारखाने सुरू ठेविले आहेत. गंगेचे शेकडो कालवे काढले आहेत. त्यास जेथे जेये मोठा गांव किंवा शहर लागले म्हणजे चांगले घाट बांधिले आहेत व त्यावरून पूलही केले आहेत. सारांश सांगावयाचा इतकाच की, प्रति गंगोध करून प्रांतांतील लोकांस गंगास्नान व पान ह्याचा लाभ इंग्रज सरकारानी दिला आहे असे म्हटले तरी चालेल.