या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२

 काय एडिटर साहेब सांगावयाचे.सदरील मो फायदा मी सांगितला तो हिंदुधर्म दृष्टीने पाहून सांगितला, परंतु ह्या कालव्या- पासून देशांत बागाइताची गर्दी झाली आणि पिकाची सुबत्ता होत चालली आहे. भात, वरण, पांढरी पोळी, एक भाजी, ताकाची कढी अगर दही आणि तूप, साकर इतके नित्य खाणारास इकडे दरमहा रुपये ३ बस होतात. इतकी तर स्वस्ताई ह्या कालव्यामुळे झाली आहे.

 हरिद्वार में गांव पूर्वी गुजर राजाच्या ताब्यांत होते. त्याची राजधानी मंगलोर हे शहर होतें. ते येथून दहा कोसांवर आहे. हल्ली त्या राजाचा नष्टांश झाल्यामुळे एकंदर अम्मल इंग्रजी झाला आहे.

 येयें एकाने बंडाच्या सालची अशी गोष्ट सांगितली कीं, हिमा- लयाच्या पायथ्याशी एका नवाबाचे राज्य होते. तो बंडाच्या साली बदलला आणि त्याला बदमाष लोकही पुष्कळ मिळाले. तेव्हां सुमारे पांच हजार हत्यारबंद शिपाई घेऊन तो नबाच हरिद्वारावरून पुढे जाण्यास निघाला. तेव्हां प्रथमतः मुळचा जो गंगेचा ओघ आहे, तेथें वाळवंट बंधायाने मोठे झाल्यामुळे त्याने तळ दिला. तेव्हां बंधाऱ्याच्या देखरेखीवरचा एक इंजिनेर व पन्नास शिपाई स्टेशनावर होते. त्यांनी बंधाऱ्याच्या फळ्या काढून टाकिल्या आणि स्वस्थ बसले. तो सुमारे २५ मिनिटांत पांच हजार लोक वाहून गेले आणि त्या इंजिनेराची मोठी शिफारस झाली. ह्यावरून पहा मुख्य प्रसंगाच्या कार्मात हिंदू लोक किती वेडे आहेत ते. तर माझा त्यांस उपदेश आहे की, बाबानो आतां पहिल्याने शहाणे व्हा, आणि मग योग्य वाटेल तर दुसरा विचार करा. अस्तु विषयांत- रांची माफी असावी.

 हरिद्वारों ब्रम्हघार्टी मुख्य स्नान करावे लागते मग कुशावर्ती म्नान व श्राद्ध होते.तेथून ३ मैलांवर कनखळ गांव आहे तेथे गंगेस एका घार्टी "कङ्ङ्खळ " असे नांव आहे. ह्याचा