या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३


अर्थ असा की, असा कोण खळ आहे कीं, जो येथें स्नान केल्यास मुक्त होणार नाही. "कुशावर्त" ह्याची कथा अशी सांगतात की, श्री दत्तात्रय समाधी लावून तपश्चर्येस बसले असत भगीरयानें भागीरथी आणिली. ती वाटेने येतांना दत्तात्रय बसल्या ठिकाण आली आणि त्यांनी जे कुश ठेविले होते ते विस्तृत केले आणि दत्ताची समाधी भंग केली.तेव्हां त्यांनी डोळे उघडले आणि पाहिले तो गंगोदकाने सर्व व्यापिले. त्यावर उभयतोचा मोठा संवाद झाल्याचे मोठे पुराणच आहे, परंतु शेवटी दत्तानों त्या जाग्यास असा वर दिला की, येथे जो श्राद्ध करून पिंड देईल त्याचे पितर मुक्तीस जातील.
 काय एडिटर साहेब त्रिंबकाजवळचे उष्टया पत्रावळीचे खङ्खल आणि तेथील कुशावर्त कधी कसे झाले ते कोणीं कृपा करून कळ- बील तर बरे होईल.
 हरिद्वार ही पुण्यभूमी पड़ली म्हणून स्त्री संभोगादि पातकें तेथें घडूं नयेत याकरितां येथे रात्री कोणी राहात नाही. किरकोळ दुकानदार, व यात्रेकरी मात्र राहतात. कुंभास येथें फार मोठा मेळा जमतो असे सांगतात. गेल्या कुंभास बारा लक्ष मनुष्ये जमला होती व तीस हजार लोक सरकाराने बंदोबस्ताकरितां आणिले होते. येयें वर सांगितलेले कवळ गांवी ब्राम्हण लोक राहतात व दुसरे ज्वालापूर म्हणून मोठे गांव २ कोसांवर आहे तेथे राहतात.
 येथून बद्रिकेदार १५० कोस आहे, परंतु रस्ता पहाडांतून सबब सेय पर्यंत पोहोचण्यास सुमारे १ महिना लागतो, तेथून ५० कोस पुढे पहाडांत बद्रिनारायण आहे.त्यास जाण्यास १५ दिवस लागतात. त्याच्या पुढे गंगोत्री ३० कोस आहे. तिकडे जाण्यासही दहा, बारा दिवस लागतात. ही यात्रा लोक वैशाख शुद्ध ३ पासून कार्तिक शुद्ध १ च्या आंत करितात.नंतर सहा महिने सर्व मार्ग बर्फाने आच्छादिले जातात.येथे पाहाडतिन जाण्यास बसण्याकरितां 'झंपान' म्हणजे एका बाजल्यास दोहो