या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५

 कुरुक्षेत्र ही पूर्वी कैरव आणि पांडव ह्यांच्यामध्ये युद्ध झालेली जागा आहे. येथे सरस्वती नदी आहे.ये पूर्वी जिल्हा स्टेशन होते, परंतु हल्ली रेल्वेमुळे तें तेथून काढून अंबाळ्यास नेले आहे. ह्या गांवीं ब्राम्हण लोकांची वस्ती दाट आहे. येथून हस्तनापूर ८ कोस आहे. ते आतां लहानसे खेडे आहे. कुरुक्षेत्राचे क्षेत्र ८४ कोसांचे आहे. येथे स्यानेश्वर महादेवाचे प्राचीन स्थान सरस्वती कुंडाच्या काठी आहे. तेथे दोन प्रहरी स्नानाचे फल आहे. येथे लक्ष्मी कुंड म्हणून एक मोठे तळें २ कोस लांबीचें आहे. ह्यांत काय ते मुख्य स्नान.भारतांतील युद्धाच्या सर्व जागा येथे अबालवृद्धांस माहीत आहेत.मला वाटते की, पुराणिकानें भारत चांगले सांगता यावे म्हणून येयें येऊन सर्व स्थाने पाहून जाव. त्याप्रमाणेच भागवतांतील कृष्ण लीला चांगली सांगावयास पाहिजे तर मथुरा वृंदावन आणि गोकूळ येथील सर्व स्थाने पाहावी.
 येथे कर्णाळ ह्मणून एक मोठे गांव २३ मैलांवर आहे. ती अंगदेशाची राजधानी राजा कर्णाचें मुख्य रहावयाचे ठिकाण होते. ह्या कुरुक्षेत्रांत भीमानी युद्ध करून ते शरपंजरी पडले ती सर्व जागा व बाणगंगा ही स्थळे, त्याप्रमाणेच समसप्तकची जागा व चक्रव्यूह आणि शकटव्यूह व कर्णाच्या फौजेची वगैरे सर्व जागा दृष्टीस पडतात. कर्णाने आपल्या फौजेनिशी जेथे तळ दिला होता त्यास राजा कर्णका खेडा म्हणतात. तेथे कर्ण मोठा दाता सबब त्याने धर्मादाय केला, तो इतका की, ब्राम्हणांनी सुवर्ण मुद्रांनी भरलेल्या गोण्याच्या गोण्या नको म्हणून टाकून गेले. त्या मुद्रा पाँच पन्नास त्या जागी दरसाल पावसाळ्यांत लोकांस सांपडतात व त्या मुद्रा लोक प्रसादिक म्हणून ज्यास्त दाम देऊन घेतात, असे येथे पुष्कळ लोक सांगतात.गदा युद्ध झालेली जागा व अश्वत्याम्याने पांडवाचे लोक निजलेल्या ठिकाणी मारले ती जागा, अशा सर्व जागा येथे आहेत. सर्य ग्रहणांत