या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्थाणू तोर्थी स्नानाचे मोठे पुण्य आहे. यंदाच्या सूर्य ग्रहणांत सुमारें पांच सहा लक्ष यात्रा तेथे जमेल असा अंदाज होता.  इकडील मुलखांत लोकांस शिकण्याची चाढ आमच्या तिकडच्य सारखी फारच कमी आहे. त्यांची अज्ञानानेही पाठ घेतली आहे. ज्याप्रमाणे आपल्या तिकडे भारतीय युद्धांत चार चाकी, २ चाकी रथ काढितात त्याप्रमाणे रथ गाड्या करण्याची इकडे सध्या वहिवाट आहे. लोभ असो देणे हे विनंती.

एडिटराचा मित्र एक फिरस्ता.

ता० १२ डिसेंबर १८७१.

मुक्काम श्री क्षेत्र वाराणशी.

ज्ञानप्रकाशकर्ते महारानः--
 वि० वि०. म्यां गेल्या पत्र तुम्हास कुरु क्षेत्राची थोडी माहिती लिहून पाठविली. हल्ली अमरसर, लाहोर, मुलतानची लिहितो.
 कुरुक्षेत्राहून अमरसरास जाण्याचें असले तर अंबाळ्यावरून जाणारी रेल्वे नजीक पडते. अंचाळा हे स्टेशन सिमल्यास जाण्यास जवळ आहे. इकडे हिमालय पर्वतास पहाड म्हणण्याचा सांप्रदाय आहे. काय सांगू एडिटरराव हा हिमालय जेव्हां म्यां पहिल्यानें हरिद्वारच्या वाटेने रुडकीस पाहिला त्या वेळची माझ्या स्थिति ! ह्या पर्वताच्या मध्य प्रदेशास जो पहाड आहे तो सर्व निरंतर श्वेत, च. कचकणारा आणि गगन चुंबित दिसला. आम्हा दक्षिणी लो- कांस हा बर्फाचा डोंगर हजारों कोस पसरलेला पहाणे म्हणने एक अद्भुत चमत्कार वाटतो. तुम्हास सारांश इतकाच सांगतो की, मी तर अल्प मतीच आहे, परंतु थोरथोरांनी जे त्याचे वर्णन लिहून ठेविले आहे ते वाचून देखील त्याचे पयार्थ ज्ञानाचा लेशही होगें मुण्कील आहे. ते काय आहे ते सांगतांच येत नाहीं. अस्तु.
 आम्ही अंचाळ्याहून निघालो तो रेल्वेचा सतलज नदीवरील