या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९

गावर बिछाना घालून तोंडाने झाडाची नाना तऱ्हेची फळे खावीं, अशी कांही चमत्कारिक योजना केलेली आहे. सर्व काही विलक्षण आहे. लाहोर हें रावी नदीच्या कांठी आहे. ह्या नदीचे जे कालवे काढलेले आहेत ते प्रत्येकी नदीच्या बरोबरीचे आहेत असे म्हटलें तरी चालेल.
 लाहारांत पाहण्यासारख्या इमारती म्हटल्या म्हणजे वजीरखानाची महजीद, बारद्वारी, जाहांगीरचा मुकरचा इत्यादि आहेत.वजीर- खानाच्या महजिर्दीत सोनेरी शाईने सर्व कुरान लिहिले आहे.बा- रद्वारीचे काम सगळे संगमरवराचे आहे. ह्या इमारती पाहिल्या म्हणजे चित्तास फारच आनंद होतो.
 पंजाबाच्या सरहदीवर मुलतान प्रांत लागतो. त्यांत मुलतान हे गांव पाहण्यासारखे आहे. येथे नरसिंह अवतार झाला. जेये नरसिंह खांबांतून निघाला तें स्थान व प्रल्हादपुरी ह्या जागा हिंदु लोकांस पाहण्यासारख्या आहेत.इकडे आज पावेतों बैराग्यां- वांचून कोणी यात्रेस आले नाहीत अशी खबर मिळते.
 मुलतानांत शाशमततबरेल नामक मठी आहे, ती पाहण्यासार- खी आहे. ह्याप्रमाणेच अकबराची महजीद वगैरे पाहण्यासारखी आहे. पत्रविस्तार भयास्तव पुरे करतों. लोभ असावा हे विनंती.

एडिटराचा मित्र एक फिरस्ता

.

शीख लोकांचे धर्म.


 पंजाबामध्ये जे शीख लोक आहेत त्यांचे नानकशाही, उदासी, गंजमक्षी, रामराई, सुय्राशाही, गोविंदसिंही, निर्मळ, आणि ना- ग, असे अनेक पंथ आहेत. हे सर्व पंथ नानाकशाही पंथाचेच वेगवेगळाले अनेक मठ होऊन त्या मठाधिपतींच्या मताभिमा- नानें भिनत्व पावले आहेत. हिंदु धर्मामध्ये आजपावेतों अ- नेक आचार्याच्या मतभेदाप्रमाणे अनेक पंथ उत्पन्न झाले